राज्यात कोरोनाचा चौथा बळी, ६५ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू.
न्युजू२४सह्याद्री -
रुग्णांची संख्या १०१ वर
मुंबई: राज्यात मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि कफ रक्तदाबाचा त्रास होत होता. दरम्यान, आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. आज पुण्यात तीन व सातार्यात एक असे चार रुग्ण सापडले आहेत. मुंबईत आतापर्यंत ४१ , पुणे १९ , पिंपरी-चिंचवड १२ , नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी आणि जिल्हा बंदी करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment