श्रीकांत मायकलवार मनपाचे नवे आयुक्त
अहमदनगर । नगर सह्याद्री - सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेचे माजी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे नोव्हेंबर२०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले तेव्हापासून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता.
शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष आपल्या मर्जीतील आयुक्त आणण्यासाठी आग्रही होते. परंतु, नगरविकास खात्याकडून मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोलापूर येथील अतिरिक्त पदावरुन कार्यमुक्त होवून अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार त्वरित स्विकारावा असे उपसचिव कैलास बधान यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
No comments
Post a Comment