घराबाहेर पाऊल टाकालं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल : उद्धव ठाकरे
News24सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. सकाळी कोणतीही नकारात्मक गोष्ट सांगणार नाही असे म्हणत त्यांनी सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या . घराबाहेर पडू नका हे मी आधीच सांगितलंय , कोरोनाची तुलना मी जागतिक युद्धाशी करतोय , आणि युद्धामध्ये शत्रू नकळत आपल्यावर वर करत असतो त्यामुळे घरातच राहू आपण जरा घराबाहेर पाऊल टाकले तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं .
यामध्ये सकारात्मक गोष्ट अशी कि यानिमित्ताने सर्व कुटुंब आज एकत्र आल आहे .' आजपर्यंत जे गमावलं होतं, ते पुन्हा मिळताना दिसतंय ' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले . सर्व कंपन्याचा फोन येत आहेत , सर्वजण आपल्याला मदत करतायेत. राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही . सर्व भाजीपाला मार्केट , किराणा दुकान , वैद्यकीय सेवा , मेडिकल या सर्व जीवनावश्यक गोष्टी चालू असल्याने नागरिकंनी बाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले .
मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे
No comments
Post a Comment