महाराष्ट्रात कोरोनाचे १०१ रुग्ण.
मुंबई । वृत्तसंस्था -
कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या १०१ वर पोहचली आहे तर देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात १ नवा रुग्ण आणि पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळत आहेत. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६० च्या वर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्ये लॉकडाउन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment