कनिका कपूरचा कोरोनाचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह .
मुंबई -
कनिका कपूरची दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. दुसऱ्यांदाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली.
यावेळी कनिकाच्या शरीरात कोरोना व्हायरसचा हाय डोस आढळला. कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी रिपोर्टवर शंका उपस्थित केली होती.
रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार तिने केली होती. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा देत असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किंबहुना सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांनी डॉक्टरांना त्रास न देण्यापेक्षा सहकार्य करावे, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
No comments
Post a Comment