Breaking News

1/breakingnews/recent

जी एस महानगर बँकेंच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३५ लाख रुपयांची मदत

No comments
अध्यक्ष शेळके यांनी धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्त


पारनेर / निघोज | News24सहयाद्री - 

बँकींग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व नेहमीच सामाजीक बांधीलकी जपणाऱ्या जी एस महानगर बँकेच्या वतीने केव्हिड १९ यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री सहायता निधीला ३५ लाख रुपयांची मदत करण्यात आली . बँकेचे अध्यक्ष अँड. उदय शेळके व कार्यकारी संचालक एम.टी.कांचन यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुर्पुद केला .

सहकार क्षेत्रातील पहिलीच भरीव मदत जीएस महानगर बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिली असून इतर सहकार क्षेत्रातील बँकांनीही याचा आदर्श घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या अगोदरही जीएस महानगर बँकेने ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर सांगली सातारा येथील पुरग्रस्तांना ११ लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली होती. तर या जीएस महानगर बँकेच्या वतीने अनेक सामाजीक शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर्श व समाजभिमूक काम केल्याबद्दल कै.गुलाबराव शेळके समाजभूषण पुरस्कार देऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यामुळे स्वर्गीय गुलाबराव शेळके यांच्या सामाजिक बांधिलकीची परंपरा व त्यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम बँकेचे अध्यक्ष अँड.उदय शेळके करत आहे.

आंतराष्ट्रीय संकटाच्या उपाय योजनांसाठी मदत गरजेची - उपमुख्यमंत्री अजित पवार
भारत देशासह महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे आंतराष्ट्रीय संकट सध्या मोठ्या प्रमाणावर घोंगावत आहे . या आजारावर लढा देण्यासाठी व उपाय योजना करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे राज्यातील सर्व सहकार क्षेत्रातील बँका व संस्थांनी मदतीसाठी पुढे आले पाहीजे. या मदतीचा शुभारंभ राज्यात नावलौकीक असलेल्या जीएस महानगर बँकेने ३५ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन केला असून सरकारच्या वतीने आभार मानले आहे. तर महाभयंकर रोगास लढा देण्यासाठी ही मदत उपयोगी होणार असल्याचे ना.पवार यांनी सांगितले.

महामारीशी दोन हात करण्यासाठी ही मदत - अँड. उदय शेळके
सध्या जगात कोरोना या महामारी आजाराने थैमान घातले असून यावर उपाय योजना करण्यासाठी व गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी सरकारला फार मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे जीएस महानगर बँक परिवाराने ही मदत देवून खारीचा वाटा उचलला असल्याचे बँकेचे अध्यक्ष अँड उदय शेळके यांनी सांगितले आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *