२३ तारखेला होणारा दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला.
न्युज२४सह्याद्री -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे .२३ तारखेला होणारा दहावीचा शेवटचा पेपर आता ३० मार्च नंतर होणार आहे. या संदर्भातील निर्णय ३० मार्च नंतर घेण्यात येतील असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले . कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले होते पण दहावी आणि बारावीचे पेपर नियमित वेळेत चालू राहतील असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता .कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी परीक्षा रद्द केल्या , तर नववी आणि अकरावीचे पेपर १५ एप्रिल नंतर होतील असा निर्णय दोन दिवसापूर्वी घेतला आहे.
No comments
Post a Comment