Breaking News

1/breakingnews/recent

Breaking : मंत्री शंकरराव गडाख यांचा मोठा निर्णय

No comments


अहमदनगर / News24सह्याद्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि वाहन पोलीस विभागाला वापरण्यास परवानगी दिली आहे . आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून वापरण्यासाठी परवानगी दिली आहे.

मंत्री गडाख यांनी पत्रात लिहले आहे, देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रहितासाठी संचारबंदी लागु केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असुन आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपुर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न्न करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या (Spotting) सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन आपण शहर व परिसरातील संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यास माझी काहीही हरकत नाही.

आज रोजी माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची व येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. करिता मी आजपासून माझे सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *