कुकडी व पिंपळगाव जोगा धरणातून पारनेरसाठी उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सुरू
आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश
शरद झावरे / नगर सह्याद्री - ऊन्हाळी हंगामासाठी कुकडी डावा कालव्यातून ४४ दिवसांचे आवर्तन १३ मार्च सोडण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तर दुसरीकडे पिंपळगाव जोगा धरणातूनही उन्हाळी आवर्तन पारनेर तालुक्यातील गावांना शेतीसाठी सोडण्यात आले असून याचा फायदा उन्हाळी कांदा, भुईमूग, वाटाणा या पिकांसह फळबागांना होणार आहे. त्यामुळे या आवर्तनाबाबत शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे या आवर्तनाचा फायदा शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पण होणार आहे.
No comments
Post a Comment