Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना महाराष्ट्रातही आला! ; नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

No comments

नाशिक / नगर सह्याद्री - कोरोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आता नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

चीनहून भारतात परतलेले तीन रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. अशात आता दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी सोमवारीच आली होती. देशात कोरोनाचे एकूण सात संशयित रुग्ण आहेत. आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर त्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होईल. सध्या नाशिकच्या या रुग्णावर उपचार सुरु कऱण्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *