Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना धसका ; बीसीसीयायचा मोठा निर्णय

No comments

मुंबई - करोना व्हायरसचा धसका बीसीसीआयने चांगलाच घेतलेला पाहायला मिळत आहेत. कारण करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आपल्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
शुक्रवारी रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरीत खेळवण्यात आली. यावेळी सौराष्ट्रने जेतेपद पटकावले. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा सध्या तरी न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत.
करोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यत जर करोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *