कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; तो रुग्णही ठणठणीत - जिल्हाधिकारी
'त्या' रुग्णास कोरोना नव्हे स्वाईन फ्ल्यू । आंदोलन, उपोषणास बंदी
अहमदनगर । नगर सह्याद्री - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत. तसेच नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्णही ठणठणीत असल्याचे सांगत प्रशासनाने तपासणीसाठी पाठविलेल्या 19 जणांपैकी 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 जणांचे रिपोर्ट लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शहरातील शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे, सिनेमागृहे, शासकीय कार्यालयातील बायोेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली आहे.
खासगी क्लास बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून जे क्लास सुरु राहतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. लग्न समारंभास बंदी नाही परंतु, तेथे गर्दी टाळावी. याबाबत प्रांताधिकारी तहसिलदार यांना निर्देश दिले आहेत.
आंदोलन, उपोषणास पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शहरालगत असलेल्या ग्रामीणच्या शाळा बंदचे निर्देश देण्यात आले आहेत.
रविवारी जिल्हा रुग्णालय येथे कोरोना आजारासंबंधित 27 जणांची तपासणी करण्यात आली. 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 जणांचे रिपोर्ट लवकरच मिळणार आहेत. नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती आता ठणठणीत आहे. जे हाय रिस्क संशयित रुग्ण होते त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आठ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांपैकी एका जणांला स्वाईल फ्ल्यू झाला असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
No comments
Post a Comment