देशातील राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या.
नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्च रोजी होणार्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २६ मार्च रोजी पार पडणार्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून अद्याप या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील जागा बिनविरोध असल्यामुळे त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार होती. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपुर, मेघालय, आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या राज्यसभेच्या जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार होती. त्यापैकी १८ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका पार पडणार होत्या.
..............
No comments
Post a Comment