कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा बंद करा- संदेश कार्ले
अहमदनगर । नगर सह्याद्री - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून अहमदनगरध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्या अनुषंगाने महापालिका नगरपालिका, नगर पंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला असून जिल्ह्यातही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. शहरी भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु आहेत. परंतु, ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक मुख्यालयी रहात नसून शहरात राहतात. शहरातील शिक्षक ग्रामीण भागात येवून अध्यापन करतात. तसेच त्यांचे पाल्य शहरातील शाळेत शिक्षण घेतात. यावेळी त्यांचेमार्फत कोरोना विषाणूचा फैलाव होवू शकतो. त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
प्राथकि आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचार्यांना मास्क, सॅनेटायझर पुरवा
सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येणार्या नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. येणारे नागरिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचार्यांना जिल्हा परिषदेमार्फत मास्क, सॅनेटायझर पुरविण्यात यावे अशीही मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
No comments
Post a Comment