Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना : महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण नाही

No comments
न घाबरता मुकाबला करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

मुंबई । वृत्तसंस्था -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला न घाबरता संकाटाचा सामना करा असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी कशा पद्धतीने तयारी सुरु आहे याची सविस्तर माहिती दिली. भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्याने चुका होतात. ज्या काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. शाळा, रेल्वे, बसेस येथे जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना योग्य सूचना देत जागरुकता निर्माण करण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
दर दिवसाआड मी आरोग्य खात्याच्या बैठका घेत आहे. महिन्याभरापुर्वी या बैठकांना सुरुवात झाली. सुरुवातीला दोन-तीन ठिकाणीच तपासणी करण्याची सुविधा होती. पण आता मुंबई, पुणे, नागपुरात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे रोगाचं लवकर निदान होईल आणि उपचार करु शकतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मुंबई, पुणे, नागपूर सहित आपल्या राज्यात जिथे आंतरराष्ट्रीय विमानं येतात तिथे सगळीकडे काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच विमानात साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांनाही काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. एखादा प्रवासी विमानात व्हायरस सोडून गेलेला असेल तर सफाई कर्मचार्‍याच्या माध्यमातून तो पसरु शकतो. यासाठी त्यांना मास्क वैगेरे गोष्टी पुरवण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
कोरोनाबाबत गांभीर्याने उपाययोजना करा : आ. विखे
कोरोना व्हायरसच्या संदर्भात राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सार्वजनिक कार्यक्रमावर काही निर्बंध घालून याबाबत जागृकता निर्माण करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. कोरोना व्हायरसच्या संदर्भात आ.विखे पाटील यांनी सभागृहात चर्चा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. याप्रसंगी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी विखे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला समर्थन देत विविध सूचना आणि मागण्या सरकारकडे केल्या. कोरोना व्हायरसच्या चर्चेने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याकडे सरकारचे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की आगामी काळात होळी रंगपंचमी सारखे सण आले आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध आणण्याचे आवाहन आ. विखे यांनी केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *