Breaking News

1/breakingnews/recent

धक्कादायक.. अहमदनगर जिल्ह्याची धकधक वाढली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर

No comments
जामखेडमध्ये आणखी तीन रुग्ण सापडले । कोरोनाबाधीतांची संख्या 8 वर


अमहदनगर | News24सहयाद्री -

जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधीत रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 8 झाली असून त्यातील एका जणास रविवारी घरी सोडण्यात आले आहे. जामखेडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी थांबलेल्या दोन परदेशी नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या संपर्कात जे जे लोक आलेत त्यातील तिघा स्थानिक व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज जिल्हा रुग्णालयात जे 28 अहवाल प्राप्त झाले आहेत त्यातील 25 जणांचे अहवाल निगेटीव्ह, तर  तीन जणांचे अहवाल पॉॅझिटीव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिली. अद्याप 80 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.

रविवारी जे दोन परदेशी नागरिक सापडले होते त्यातील एक फ्रांस तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील होता. ते नगर शहरातील मुकुंदनगर येथे एक दिवस तर जामखेड येथे तब्बल 12 दिवस राहिले होते. एकूण 14 जणांचा हा ग्रुप होता. या चौदा जणांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील दोघांचे अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या स्थानिक नागरिकांचा शोध प्रशासन घेत असून ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यातील जामखेड येथील तीन स्थानिकांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *