Breaking News

1/breakingnews/recent

अलिबागच्या समुद्रात प्रवासी बोट उलटली, 88 जणांचे वाचवले प्राण

No comments

मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून मांडव्याकडे जाणाऱ्या प्रवासी बोटचा अलिबागजवळच्या समुद्रात उलटून अपघात झाला. यावेळी बोटीत 78 प्रवासी होते, पण मच्छीमार आणि पोलिसांच्या प्रंसगावधानाने कोणतीही जीनितहानी झाली नाही. मांडव्याला जाताना अचानक जेडीच्या काहीअंतर आधी ही बोट बुडायला लागली. यावेळी मच्छीमार आणि पोलिसांनी बुडणाऱ्यांचे प्राण वाचवले.
मुंबईतील गेटवरून शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास निघालेली बोट मांडवाजवळ बुडायला लागल्याने मोठा गोंधळ उडाला होता. सद्गुरु कृपा बोट बुडत असताना मांडवा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान दाखवत बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांचा जीव वाचवला. त्यांच्या या कामगिरीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. देवदूत पोलिस आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रवाशांनी म्हटलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *