महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ; आकडा ६३ वर
न्युज२४सह्याद्री -
राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून , हा आकडा ६३ वर येऊन पोहचला आहे. एका दिवसामध्ये ११ रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली . त्यामध्ये ११ पैकी १०जण मुंबईचे आहेत .त्यातले ८ जण परदेश दौऱ्या वरून आले आहेत ते ३ जणांना संसर्गामुळे कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे . ह्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले. त्या पार्श्वभूमीवर चाचणी केंद्राची स्थापना केली पण महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेली पाहता अजून चाचणी केंद्र उभारण आवश्यक आहे यासाठी केंद्राकडे मुख्यमंत्र्यांनी याची मागणी केली . तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याकडे चाचणी केंद्रासाठी लागणारे किट्सही वाढवण्याची मागणी केल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
No comments
Post a Comment