Breaking News

1/breakingnews/recent

धक्कादायक ; मनपा अधिकार्‍याकडून महिलांकडे शरीरसुखाची मागणी !

No comments
महानगरपालिकेतील कर्मचारी महिलेची निनावी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर । नगर सह्याद्री -
अहमदनगर महापालिकेतील आस्थापना विभागातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने पदाचा गैरवापर करून महिलांशी असभ्य वर्तन करत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला कर्मचार्‍याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जानेवारी महिण्यात निनावी पत्राद्वारे केली होती. या तक्रारीची प्रत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उघड झाल्याने महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी नारी शक्ती असुरक्षितच असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निनावी पत्रात संबधित महिलेने म्हटले आहे की, मी व माझ्या सारख्या महिला अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी असून आमच्या महानगरपालिकेत दुसर्‍या महापालिकेतून गैररित्या सामावून घेतलेले व सध्या अस्थापना विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी जाणीवपूर्वक महिलांना ब्लॅकेल करून शरीर सुखाची मागणी करतात. आतापर्यंत बर्‍याच महिला कर्मचार्‍यांना त्यांचा वाईट अनुभव आलेला आहे. पदाधिकारी, अधिकारी व स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून भिती दाखवून हा कर्मचारी महिलांवर दबाव टाकतो. तसेच युनियनचे पदाधिकारीही त्याला पाठीशी घालतात.

महापालिकेत तक्रार कोणाकडे करावी हा संभ्रम असल्याने व सदर कर्मचार्‍यावर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांची मर्जी असल्याने हा कर्मचारी वाटेल तसे मनमानी कारभार करत आहे. जोपर्यंत या कर्मचार्‍याला सदर महापालिकेतून दुसरीकडे पाठवत नाही तो पर्यंत त्याच्या जाचाला कंटाळून मोठी दुर्घटना झालेली असेल. यासाठी संपूर्ण महापालिका जबाबदार असेल, असा इशारा पत्रात दिला आहे.

आपणांस विनंती की, आपण तातडीने लक्ष घालून महिला कर्मचार्‍यांना सुरक्षा द्यावी व सदर कर्मचार्‍याला शासन करावे, ही सर्व त्रस्त महिला कर्मचार्‍यांची नम्र विनंती, असे निनावी पत्रात महिला कर्मचार्‍याने म्हटले आहे. संबधित महिलेने हे पत्र दि. 4 जानेवारी 2020 रोजी पाठविले असून ते मुख्यमंत्री सचिवालयाला दि. 10 जानेवारी 2020 रोजी पोहचले आहे. हेच निनावी पत्र महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रातील मजकुर व त्यातील तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास मंत्रालय कशा पद्धतीने दखल घेते, याकडे लक्ष लागले आहे.

शासकीय व निमशासकीय अशा कामाच्या ठिकाणी महिला कर्मचार्‍यांना अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. मात्र याची तक्रार कोणाकडे करायची, तक्रार केली तर न्याय मिळेल का नाही? तसेच तक्रार केल्यास बदनामी होईल, या भितीने तक्रार करण्याचे टाळतात. मात्र या महिला कर्मचार्‍याने निनावी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याने अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *