Breaking News

1/breakingnews/recent

जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा

No comments

शासनाचा निर्णय खंडपिठाकडून रद्द  
अहमदनगर । नगर सह्याद्री  - जिल्हा बँकेसह विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द ठरवला आहे. सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय असंवाधैनिक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा निर्णय औरंगाबाद खंडपिठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी दिला. अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकिल अ‍ॅड. नितीन गवारे यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *