जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींची ऑगस्टमध्ये रणधुमाळी
एप्रिलमध्ये सरंपचपदाचे आरक्षण जाहीर होणार, शनिवारी अंतिम प्रभागनिहाय रचना
अहमदनगर । नगर सह्याद्री -
दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींची रणधुमाळी ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण एप्रिलमध्ये जाहीर होणार असून सरपंच हे शासनाच्या नव्या धोरणानुसार सदस्यांमधून निवडण्यात येतील. या ग्रामपंचायतींचा प्रभागनिहाय आरक्षण व हरकतीचा अहवाल मंगळवारी,दि.17 जिल्हाधिकार्यांना सादर केला जाणार असून शनिवारी, दि. 21 नागरिकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण कळणार आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण तहसीलदार जाहीर करणार असून महिला सरपंचाच्या आरक्षणासाठी प्रांताधिकार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये होणार्या या 766 ग्रामपंचायतींसाठी 2652 प्रभाग असून एकूण ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 7226 इतकी आहे. यात सर्वात अधिक ग्रामपंचायती संगमनेर तालुक्यातील 94 इतक्या असून सर्वात कमी ग्रामपंचायती ह्या राहाता तालुक्यातील म्हणजेच 25 इतक्या आहेत. संगमनेर पाठोपाठ पारनेर तालुक्यातील 88 तर, पाथर्डी तालुक्यातील 78, श्रीगोंंदा व नेवासा तालुक्यातील प्रत्येकी 59 व नगर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तालुका ग्रामपंचायत संख्या प्रभागांची संख्या सदस्य संख्या
अकोले 52 115 441
संगमनेेर 94 333 880
कोपरगाव 29 101 279
श्रीरामपूर 27 102 281
राहाता 25 110 301
राहुरी 45 154 429
नेवासा 59 233 576
नगर 57 210 565
पारनेर 88 325 786
पाथर्डी 78 250 678
शेवगाव 48 160 408
कर्जत 56 195 516
जामखेड 49 155 499
श्रीगोंदा 59 209 587
एकूण 766 2652 7226
No comments
Post a Comment