Breaking News

1/breakingnews/recent

विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी तरूणीला दमदाटी

No comments
एमआयडीसी पोलिसांनी बदलली आरोपींची नावे


अहमदनगर । नगर सह्याद्री -
तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेला अदखलपात्र गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादी तरूणीला रस्त्यात अडवून आमच्या विरोधात तक्रार देते काय? तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारू अशी धमकी देत शिविगाळ केल्याप्रकरणी दोघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

याप्रकरणी ऋषी जपे (पूर्ण नाव माहित नाही) व अभिषेक रावसाहेब मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हकीगत अशी की, फिर्यादी तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रावसाहेब जयवंत मोकाटे (रा. इमामपूर), ऋषी जपे, अभिषेक जपे, विमल मोकाटे, जरे सर, पालवे सर, शिंदे सर (पूर्ण नाव व पत्ते माहित नाहीत) यांनी दि. 2 मार्च 2020 रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, म्हणुन यातील ऋषी जपे व अभिषेक रावसाहेब मोकाटे यांनी रस्त्यात अडवून शिविगाळ करत गुन्हा मागे घे व दिलेला जबाब मागे घे, नाहीतर अंगावर अ‍ॅसिड टाकून जीवे ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. यानंतर संबधित तरूणीने या दोघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ना. साठे हे करीत आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी बदलली आरोपींची नावे
एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल करण्यासाठी आईसोबत फिर्यादी तरूणी गेली असता पोलिसांनी फिर्याद घेतली. मात्र या फिर्याद घेतांना आरोपींची नावे चुकीची टाकून खर्‍या आरोपींना पाठिशी घालण्याचे काम पोलिसांनी केले असल्याचा आरोप फिर्यादी तरुणीने केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *