Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना : नगरचे ‘ते’ चौघे निगराणीत

No comments
अहमदनगर । नगर सह्याद्री -
जगभरात भितीचे थैमान घालणार्‍या कोरोनाचे दोन रूग्ण पुण्यात काल आढळले होते. त्यांच्याबरोबर दुबईपासून प्रवास केलेल्या 40 प्रवाशांमधील 4 प्रवासी हे नगरचे असून त्यांच्यामध्ये कोरोनाची मात्र कोणतीही लक्षणे नसल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. चौघेही एकाच कुटुंबातील असून या चौघांनाही त्यांच्याच घरी आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सदर चौघांना पुढील 28 दिवस कुणाच्याही संपर्कात येवू न देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे.

वीणा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून 20 ते 29 फेब्रुवारी दरम्यान 40 जण दुबईला गेले होते. ते 1 मार्चला परत आले. आल्यानंतर त्यातील पुण्याच्या दाम्पत्याला दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे सोमवारी दुपारी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले असता त्यातील एकाला कोरोना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्यासोबत प्रवास केलेल्या प्रवाशांची यादी समोर आली असून त्यात नगरमधील एकाच कुटुंबातील चौघेजण असल्याचे समोर आले आहे. या चौघांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली त्यांच्याच घरी ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकही रूग्ण नाही : जिल्हाधिकारी
नगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. पुण्यातील जे संशयीत रुग्ण आहे त्यांच्यासोबत प्रवास केलेल्यांमधील चौघे जण नगरचे आढळून आले असून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नाहीत, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *