Breaking News

1/breakingnews/recent

आरोग्य सह्याद्री.. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पहा हे लाभदायक फळ

No comments


News24सह्याद्री-

निरनिराळ्या ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे, ही निसर्गाने मनुष्याला दिलेली देणगीच आहे. ही ताजी रसरशीत फळे शरीराच्या आरोग्याकरिता अतिशय लाभदायक असतात. आहारचे योग्य संतुलन राखायचे असेल, तर भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश आहारामध्ये असायला हवा. अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर. हे फळ ताजे आणि सुकविलेले अश्या दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असून, याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात...

चला तर मग आरोग्यदायी अंजीरचे फायदे जाणून घेउयात .........
पोट साफ करायचं असेल तर अंजीर खावे. कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.
अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेलं अंजीर खावं. कारण अंजीर हे थंड असते.
जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यापासून शरीराची हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.
पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात...
आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते. 
अंजिराचे सेवन लो किंवा हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहे..   
ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे  

अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात.   
अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते.  
नियमित 10 दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. 
अशा आरोग्यदायी अंजिरचे नक्की सेवन करा.आणि आपले शरीर स्वास्थ्य सुद्रुढ ठेवा... 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *