राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जितेश सरडे यांची वर्णी!
शरद झावरे । न्युज 24 सह्याद्री - आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तसेच पारनेर नगर मतदार संघाचे नाव आपल्या वकृत्व गुणातून व सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचविणारे शिवव्याख्याते जितेश सरडे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नोंद घेतली असून त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे.
मा.आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील हे या महत्वाच्या पदाची धुरा संभाळत होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्या नंतर गेले काही दिवस हे पद रिक्त होते. वरिष्ठ पातळीवर त्या पदासाठी विविध मान्यवरांची चाचपणी केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेत त्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेणारे व सिंहगड महाविद्यालयातून औषध निर्माण क्षेत्रात पदवी प्राप्त करत स्वतः उच्चशिक्षित असल्याने तसेच विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून दोन वर्ष अभ्यासू विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आक्रमकपणे सोडवण्यासाठी आपल्या वकृत्व गुणाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांनी विविध प्रादेशीक वाहिन्यांवर विद्यार्थी चर्चासत्रात सहभाग नोंदवत जनजागृती करत, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवर मार्ग काढत त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका अनेक जाहीर सभांमधून मांडत निलेश लंके प्रतीष्ठानच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येयधोरणे, विचार आपल्या वक्तृत्वातून प्रभावीपणे मांडत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्गात त्यांचा दांडगा संपर्क झाला असून, आमदार निलेश लंके यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
त्याची दखल राष्ट्रवादी पक्ष श्रेष्ठींनी वरिष्ठ पातळीवर घेतली असून लवकरच त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड होऊ शकते ?
युवकांनी राजकारणात आले पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार वारंवार सांगत आले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले शमेहबूब शेख यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदी निवड करून पक्षाने सर्व सामान्य घरातील तरुणाला दिलेली संधी या ही वेळी या पदासाठी सामान्य घरातील मुलाला भेटणार का ? सरडे हे या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे.
No comments
Post a Comment