कोरोनाबाबत हॉट्सअॅपवर चुकीची माहिती पसरविल्याबद्दल नगरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
सुशिल थोरात । न्यूज 24 सह्याद्री - आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार व्हाट्सअॅप ग्रुप वर कोरोना बाबत चुकीची माहिती टाकल्याबद्दल तीन जणांवर कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस बद्दल चुकीचा मेसेज व्हाट्सअप ग्रुपला टाकल्यामुळे त्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यापूर्वीच जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाने कोरोनाबाबत चुकीची माहिती हॉटसअॅपवर टाकू नये अशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच चुकीचे मेसेज टाकले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
कोरोनाला रोखण्यासाठी आपणही सावधान व्हा आणि असे खोटे मेसेज पसरू नये म्हणून ग्रुप अॅडमीनने सतर्कता पाळण्याची गरज आहे.
No comments
Post a Comment