Breaking News

1/breakingnews/recent

शाळा, कॉलेजसह आठवडे बाजार बंद ; प्रशासनाचे आदेश

No comments

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
राजेंद्र राऊत । न्यूज 24 सह्याद्री - कोरोनाच्या कोविड-१ या घातक  विषाणूचा  संसर्ग  होऊ नये  यासाठी  जिल्हाधिकारी  यांनी  दिलेल्या आदेशानुसार श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय उद्या दि. १६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून याबाबत पालक-विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून सोशल मिडियामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्याचा होणारा आठवडा बाजार रद्द करण्यासंदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनास आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्याचा आठवडे बाजार रद्द केला असल्याची माहिती नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी न्यूज 24 सह्याद्रीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये दिनांक १६ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र बंद राहतील असे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी केले आहेत तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात मात्र आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता संबंधित संस्थांनी घ्यावी अशा सूचना या आदेशामार्फत देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार श्रीगोंदा शहरासह तालूक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक शैक्षणिक संस्था उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद राहणार असून यादरम्यान होणारे सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे, यात्रा रद्द करण्यात आल्या आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, शेतकऱ्यांनी आठवडे बाजारासाठी भाज्या फळे विक्रीसाठी आणू नयेत तसेच हॉटेल, मॉल बंद ठेवावेत, प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सर्वांनी सहकार्य करून स्वतःची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *