मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन : रोहित पवार
अहमदनगर / नगर सह्याद्री –
मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नाही, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. कर्जत-जामखेडमधील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
तुम्हाला मंत्री आणि जिल्ह्याच पालकमंत्री व्हायला आवडेल असा प्रश्न विचारल्यानंतर रोहित पवार म्हणाले, “आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पार्टी व्यक्तिगत चालत नसते त्यात अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यात अनेक समीकरणे असतात त्यात मला किती वाटलं मला संधी द्यावी आणि जर संधी दिली तर मी त्याच सोन करेल.
No comments
Post a Comment