कर्जमाफी व शिवभोजनास मंजुरी
मुंबई / वृत्तसंस्था
राज्यातील शेतकर्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी व प्रत्येक जिल्ह्यात गरजूंना १० रुपयांत ’शिवभोजन’ या दोन्ही योजनांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शिवभोजन ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून त्यासाठी ३ महिन्यांत ६.४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनांची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरू केले जाईल. त्याद्वारे रोज कमाल ५०० थाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली.
No comments
Post a Comment