घरी उशिरा येते म्हणून पतीने केली पत्नीची हत्या
पुणे –
घरोघरी जाऊन धुण्या भांड्याची कामं करणारी पत्नी कामावरून उशिरा घरी येते म्हणून पतीने तिचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (२३ डिसेंबर) पहाटे पिंपळे गुरव इथं ही घटना घडली.
शैला हनुमंत लोखंडे (वय ४०) असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर हनुमंत बाबुराव लोखंडे (वय ५८, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) असं पतीचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला या धुणी-भांड्याची कामं करीत होत्या. त्यांना कामावरून येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि हनुमंत यांच्यात नेहमी भांडण होत असे.
No comments
Post a Comment