अण्णांच्या मौन व्रताचा पाचवा दिवस
पारनेर । नगर सह्याद्री
महिलांच्या सुरक्षिततेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी द्या, यासह महिलांच्या विविध प्रकारचे प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनात चौथ्या दिवशी म्हसणे फाटा येथील समर्थ शैक्षणिक संकुलमधील विद्यार्थ्यांसह वाशिम व मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा घ्यावी, यासह काही प्रश्नाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सकाळी पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील समर्थ शैक्षणिक सकुलचे प्रमुख कैलास गाडीलकर, शिल्पा गाडीलकर यांच्यासह समर्थच्या मुलींनी राळेगणसिद्धीत फेरी काढली. संत यादवबाबा मंदिरात अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाले. यासह वाशी, मालेगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
No comments
Post a Comment